मुंबई - काँग्रेसच्या नाराज 25 आमदारांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून ( Congress 25 MLA Write Letter Soniya Gandhi ) भेटीची वेळ मागितली आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. त्याचा आधार घेत भाजपा नेते, आमदार राम कदम यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली ( Ram Kadam Criticizes Mahavikas Aghadi ) आहे.
राम कदम म्हणाले की, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की हे तीन पक्षाचे सरकार फक्त बिल्डर व श्रीमंत लोकांसाठी आहे. बदल्या वसुलीसाठी हे सरकार फक्त काम करत आहेत. या सरकारमध्ये आमदारांची काम होणार नसतील तर १२ कोटी जनतेने आशेने कोणाकडे बघायचे. हे तीन पक्षाचे सरकार लोकांची सेवा करायला चालवत नाही. हे फक्त वसुलीसाठी काम करत आहे. या तीन पक्षांमध्ये आपापसातच मतभेद असल्याकारणाने महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला आहे, अशी टीकाही राम कदम यांनी केली आहे.
काँग्रेसच्या नाराज २५ आमदारांचे सोनिया गांधींना पत्र -काँग्रेसच्या २५ आमदारांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांची नाराजी उघडपणे दिसत आहे. आपल्याच पक्षातील मंत्री आपल्याच आमदारांच्या मागणीला न्याय देत नाही, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ही बाब नवीन नाही आहे. यापूर्वी सुद्धा काँग्रेस आमदारांनी त्यांच्या मंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. परंतु, यंदा ज्या पद्धतीने निधी दिला जात नसेल तर ते मतदार संघात विकास कसा करणार हा प्रश्न आमदारांना पडला आहे. याबाबत खुद्द सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप करून यावर तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आमची अडीच वर्षे वाया गेली, असेही काही आमदारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -Saurabh Tripathi Bail Rejected : निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठीचा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला