मुंबई - वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार नाही, अशी चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, वरळीमध्ये आघाडीचा उमेदवार असणारच, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केले.
वरळीमध्ये आघाडीचा उमेदवार असणारच, नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण - वरळीमध्ये आघाडीचा उमेदवार
शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, हे स्पष्ट झाल्यानंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे उभे राहणार असून त्याजागी राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नसल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, वरळीमध्ये आघाडीचा उमेदवार असणारच, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
![वरळीमध्ये आघाडीचा उमेदवार असणारच, नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4629073-1021-4629073-1570025272649.jpg)
Congress-NCP Press Conference
वरळीमध्ये आघाडीचा उमेदवार असणारच, नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण
हेही वाचा : 'भाजपमध्ये सगळे गँगवॉरचे लोक एकत्र येतायत'
आघाडीमध्ये 'मनसे' नाहीच..
मनसेशी आघाडीमध्ये येण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे देखील यावेळी नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या वेळी मनसेने शिवसेना-भाजप विरोधात प्रचार केला होता. मात्र, तेव्हाही याबाबत काही बोलणी नव्हती झाली, आणि आताही तशी बोलणी झाली नसल्याचे मलिक यांनी सांगितले.
आघाडीमध्ये 'मनसे' नाहीच..
हेही वाचा : गांधी@१५० : पंतप्रधान मोदी यांनी केली 'ईटीव्ही भारत'च्या गाण्याची प्रशंसा...
Last Updated : Oct 2, 2019, 8:27 PM IST