महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एसटी विलिनीकरण संदर्भातील अहवाल हायकोर्टात न दिल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींना नोटीस पाठवणार - गुणरत्न सदावर्ते - एसटी विलिनीकरण गुणरत्न सदावर्ते प्रतिक्रिया

एसटी विलिनीकरण ( ST merger ) संदर्भात स्थापन केलेली त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यासाठी दिलेली 12 आठवड्यांची मुद्दत आज संपली आहे. मात्र, समितीने अजूनही अहवाल सादर केलेला नाही. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा का नाही व्हावी? असा सवाल एस.टी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांनी विचारला आहे.

ST merger gunaratna sadavarte
एसटी विलिनीकरण गुणरत्न सदावर्ते प्रतिक्रिया

By

Published : Feb 3, 2022, 9:42 PM IST

मुंबई -एसटी विलिनीकरण ( ST merger ) संदर्भात स्थापन केलेली त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यासाठी दिलेली 12 आठवड्यांची मुद्दत आज संपली आहे. मात्र, समितीने अजूनही अहवाल सादर केलेला नाही. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा का नाही व्हावी? असा सवाल एस.टी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांनी विचारला आहे.

माहिती देताना एस.टी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते

हेही वाचा -Tadoba Tourism Plan : व्याघ्रदर्शनासाठी ताडोबाचा पर्यटन आराखडा सादर करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कायदेशीर नोटीस पाठविणार

एसटी कामगारांची प्रश्ने सोडवण्यासाठी राज्याच्या प्रशासनाला वेळ नाही, मात्र दारू आणि वाईन या संदर्भात कायदे आणि मंजुरी देण्यासंदर्भात या सरकारला वेळ आहे, असा देखील आरोप सदावर्ते यांनी केला आहे. एसटी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात जे कोणी जबाबदार आहेत त्यांना पुढच्या आठवड्यात कायदेशीर नोटीस पाठविणार असल्याचेही सदावर्ते यांनी सांगितले.

त्रिसदस्यीय समितीला अहवाल देण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता. समिती मुख्यमंत्र्यांकडे स्वतः अहवाल तयार करून देणार आहे. ज्या दिवशी अहवाल पूर्ण होईल त्या दिवशी ते मुख्यमंत्र्यांकडे सादर करतील, त्यानंतर मुख्यमंत्री मुख्य सचिवांच्या माध्यमातून तो अहवाल कोर्टात सादर करतील, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतन वाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करून सुद्धा कर्मचारी आंदोलन मागे घेत नाही. या संपावर तोडगा निघावा, यासाठी एसटी कृती समितीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन केले. तरी सुद्धा कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाची जोरदार कारवाई सुरू आहे. आज १८९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. एकूण बडतर्फ कर्मचारी संख्या ७ हजार २५२ झाली आहे. आतापर्यंत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच, एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार ३७३ झाली आहे.

६२ हजार पेक्षा जास्त कर्मचारी संपात

सध्या ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी फक्त २७ हजार २८८ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. उर्वरित ६२ हजार ७१२ कर्मचारी अजूनही संपात सहभागी आहेत. आज राज्यभरात एसटीच्या ८ हजार २८४ फेऱ्या झाल्या. या शिवाय आज २५० आगारांपैकी २४५ आगार सुरू झाले असून ५ आगार अद्यापही बंद असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येत चढ उतार, ८२७ नव्या रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details