महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Population control in India : लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्तीचा कायदा करावा लागेल - देवेंद्र फडणवीस

देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली ( Population is increasing rapidly ) आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी (Population control ) आपल्याला कायदा करावा लागेल. असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केले आहे.

Population control in India
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Oct 12, 2022, 6:56 AM IST

मुंबई : देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली ( Population is increasing rapidly ) आहे. त्यामुळे देशाच्या लोकसंख्येवर आपल्याला बोलावच लागेल. लोकसंख्या नियंत्रणासाठी ( Population control ) आपल्याला कायदा करावा लागेल. मात्र हा कायदा करत असताना नियोजनबद्ध असा हा कायदा करावा लागेल. कारण चीन सारख्या देशाने लोकसंख्या नियंत्रणासाठी केलेल्या कायद्यानंतर त्यांच्या देशात आता केवळ अवलंबून राहणाऱ्या लोकांची संख्या अधिक झालेली आहे.

कायदा करताना नियोजनबद्ध असा कायदा करावा लागेल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केले आहे. मात्र आपलं हे वैयक्तिक मत आहे याचा आपल्या पक्षाशी कोणताही संबंध नाही. हे सांगायलाही देवेंद्र फडणवीस विसरले नाहीत. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत त्यांनी आपलं हे मत व्यक्त केलं. या मुलाखतीच्या वेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे देखील उपस्थित होते. तर त्या वृत्तपत्रासाठी त्यांची मुलाखत अभिनेते नाना पाटेकर ( Actor Nana Patekar ) यांनी घेतली होती.


देशात समान नागरी कायद्याची गरज :देशात प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा करण्याचा अधिकार दिला आहे देशात गोवा या राज्याने समान नागरी कायदा अस्तित्वातही आणला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातही समान नागरी कायदा होईल अशी आशा देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखती दरम्यान व्यक्त केली. तसेच समान नागरी कायदा म्हटलं की काही लोक समाजात चुकीचा समज पसरवतात समान नागरी कायदा आल्यामुळे दलित शोषितांचा आरक्षण जाईल अशी भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. एक देश, एक समाज, एक कायदा' अशा प्रकारचा हा समान नागरी कायदा आहे. त्यामुळे तो गरजेचा आहे असे यावेळी देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details