मुंबई -राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी सर्वसमावेशक धोरण करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करणारी माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत मागील शासनाने मंत्रीगटाची नेमणूक केली होती. तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचे अध्यक्ष होते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत या मंत्रीगटाने शिफारस केली होती. ही कार्यवाही गेल्या वेळेसच्या शासन काळातच सुरू झाली आहे.