मुंबई - मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली हवाईसेवा सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला. यानंतर सोमवारपासून मुंबईतून काही प्रमाणात विमानसेवा सुरू करण्यात आली.
मुंबईतून विमानसेवा सुरू, मात्र दुसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद - lockdown in mumbai
मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली हवाईसेवा सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला. यानंतर सोमवारपासून मुंबईतून काही प्रमाणात विमानसेवा सुरू करण्यात आली. आज दुसऱ्या दिवशी प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज 25 प्रवासी विमानांच्या उड्डाणाला परवानगी देण्यात आली आहे. तसेच २५ विमानेच लॅन्ड करू शकतात. आज दुसऱ्या दिवशी प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी प्रवासी संख्या देखील कमी दिसली. काहींना सोमवारी फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे विमानतळावरच रात्र काढण्यास भाग पडले. विमानतळावर सोशल डिस्टन्सिगच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी तैनात आहे. मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे.
सुरक्षा दलाला थर्मल स्क्रीनिंग करावी लागणार असल्याने प्रवाशांना विमानतळावर प्रवेश करण्यासाठी जास्त वेळ लागत होता. तसेच प्रत्येक प्रवाशाने आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे आवश्यक असल्याने त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे.