महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील सुशोभीकरणाची कामे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा, आयुक्तांचे आदेश - आयुक्तांनी घेतला सुशोभीकरणाचा आढावा

मुंबईतील सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार ५० टक्के कामे डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत तर मार्च २०२३ अखेरपर्यंत सर्व कामे मार्गी लावा असे आदेश पालिका आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत (Complete beautification work in Mumbai).

Commissioner orders
Commissioner orders

By

Published : Sep 16, 2022, 9:33 PM IST

मुंबई - मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. त्याचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले आहेत. (Complete beautification work in Mumbai) त्यानुसार ५० टक्के कामे डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत तर मार्च २०२३ अखेरपर्यंत सर्व कामे मार्गी लावा असे आदेश पालिका आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईतील सुशोभीकरणाची कामे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा

आयुक्तांनी घेतला सुशोभीकरणाचा आढावा -मुंबई महानगरपालिकेकडून रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे हाती घेतली आहेत. त्याचा प्राथमिक आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन दिवसांपूर्वी आयुक्त डॉ. चहल यांनी सादर केला होता. या आराखड्याची संकल्पना पसंतीस उतरल्याने मुख्यमंत्री महोदयांनी त्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाची ऑनलाईन बैठक घेतली.

रस्ते, फुटपाथ सुशोभीकरण -या बैठकीत रस्त्यांचे पुनर्पृष्‍टीकरण करावे, झेब्रा क्रॉसिंग सुस्पष्टपणे दिसतील, अशा रीतीने रंगवावेत, रस्ते दुभाजकांमधील मोकळ्या जागेत सुशोभित फुलझाडांची, हिरवळीची लागवड करावी. १५ किलोमीटर लांबीच्या फुटपाथवर स्टॅम्प काँक्रिट, आकर्षक विद्युत दिवे, अतिरिक्त जागेत शोभिवंत कुंड्या अशा बाबींचा समावेश करून उत्कृष्ट पदपथांची निर्मिती करावी. पदपथांवर जिथे शक्य आहे तिथे नाविन्यपूर्ण, कलापूर्ण व परिसर सौंदर्य वाढविणारी आसने लावावीत. प्रमुख रस्त्यावरील पथदिव्यांचे सुशोभीकरण करावे. विद्युत खांबांना प्रकाश योजना करावी. मुंबईत अनधिकृत केबल, तारा लटकलेल्या आढळतील, त्या सर्व तातडीने काढून टाकाव्यात, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

पूल, स्कायवॉक, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण -पूल आणि उड्डाणपूलांवर रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करावी. उड्डाणपुलांखालील जागांवर असलेले टाकाऊ साहित्य हटवून स्थानिक नागरिकांना विरंगुळा मिळेल, मुलांना खेळता येईल, आबालवृद्धांना चालता येईल, अशा रीतीने क्षेत्र निर्माण करावे. स्कायवॉकचा सर्वसामान्य नागरिकांनी उपयोग करावा, विशेषतः रात्रीच्यावेळी लोकांना त्याचा वापर करता आला पाहिजे, या दृष्टीने स्वच्छता, रंगरंगोटी आणि विद्युत योजनेची कामे करावीत. तसेच विद्युत सुशोभीकरण करावे. वाहतूक बेटांची निवड करून त्यांचे अद्ययावतीकरण आणि सुशोभीकरण करावे. समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता राखून विद्युत व्यवस्था करणे, किनारे सुशोभित करण्यासाठी आकर्षक प्रकाश योजना करावी. असे निर्देश आयुक्तांनी दिले.


डिजिटल जाहिरात फलक -जगभरात आता पारंपरिक जाहिरात फलकांच्याऐवजी डिजिटल जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व अधिकृत जाहिरात फलक येत्या ६ महिन्यात टप्प्याटप्प्याने डिजिटल जाहिरात फलकांमध्ये रूपांतरित करण्यात येतील. प्रामुख्याने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांवरील सर्व जाहिरात फलक १०० टक्के डिजिटल करण्याचे नियोजन आहे. डिजिटल जाहिरात फलक कमी वेळेमध्ये बदलता येतात आणि अधिक आकर्षक असल्याने अधिक उत्पन्न देणारे ठरतील. त्यासाठी नवीन जाहिरात धोरण लवकर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


गेटवे ऑफ इंडियाचे सुशोभीकरण -मुंबई महानगराला इतिहासाचा वारसा आहे. महानगरात असलेल्या किल्ल्यांवर विद्युत रोशणाई करण्यात यावी, त्यातून पर्यटनाला अधिक चालना मिळेल. तसेच भारताचे प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभीकरण हाती घेण्यात यावे असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details