मुंबई -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने देश सर्व जाती धर्म लिंग पंथ या भेदभावाच्या पलीकडे जाऊन एकत्र येत असल्याचा आपण पाहत आहोत जनता आपापल्या घरात घराबाहेर राष्ट्रध्वजाला नमन करत त्याला अभिवादन करत समतेचा विचार घेत एकमेकांना भेटत आहे मात्र त्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील अध्यापक महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या समोर आहे त्या ठिकाणी बीएडच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राचार्यांनी भेदभावाची वागणूक दिल्या संदर्भातली तक्रार आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे दिली गेली आहे
तपास अधिकाऱ्यांकडे प्रकरण चौकशीदेशाचे भविष्य शाळेमध्ये घडते आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवतात जे शिक्षक होणार आहेत असे विद्यार्थी अध्यापक महाविद्यालयामध्ये मुंबईमध्ये शिकत आहेत शासनाचा अध्यापक महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ आहे त्या ठिकाणी मुंबई ठाणे रायगड पालघर आणि आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी विद्यार्थी शिक्षक होण्यासाठीच शिक्षण घेत आहे या अध्यापक विद्यालयांमध्ये मुली देखील आहे मुलं देखील आहे त्यांचे एकत्र शिक्षण होत आहे मुलांनी आजार मैदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी मध्ये नमूद केला आहे की आमच्या प्राचार्य उर्मिला मॅडम सातत्याने आदिवासी म्हणून हिणवतात मुली जर बाथरूमला जाताना स्कार्फ काढून खुंटीला टांगतात त्यावेळेला अत्यंत अश्लील शेरेबाजी करतात तुम्ही आदिवासी लोक तुम्हाला याचा उच्चार व्यवस्थित जमत नाही तुम्ही तसेच राहणार अशा पद्धतीची हीन वागणूक मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केलेला आहे
कायद्यानुसार उचित कारवाई होईल यासंदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी ईटीव्ही भारतने बातचीत केली असता ते म्हणाले विद्यार्थ्यांनी तक्रार दिली असेल तर पहातो आणि या संदर्भात काय पुढील कार्यवाही असेल तर ती आम्ही नक्कीच करू परंतु विद्यार्थ्यांचे म्हणणं असेल की तात्काळ ॲट्रॉसिटी लावा तर आम्हाला नेमकं पहावा लागणार चौकशी करावा लागणार आणि मग त्या संदर्भातली पुढील कारवाई आम्ही करू असे त्यांनी नमूद केले तसेच तपास अधिकारी पूनम जाधव याचा तपास करून एफ आय आर नोंदवतील कायद्यानुसार उचित कारवाई होईल असे आश्वासन आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना सांगितले