महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Complaint against Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार - Chief Minister Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांची पत्नी तथा सामना दैनिकाच्या संपादिका रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray National Flag Dishonour ) यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ध्वजारोहणावेळी ( Complaint against Rashmi Thackeray ) त्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला असल्याची तक्रार डॉ. जयश्री पाटील यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण

By

Published : Jan 27, 2022, 2:19 AM IST

Updated : Jan 27, 2022, 4:13 PM IST

मुंबई -प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ध्वजारोहणाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी तथा सामना दैनिकाच्या संपादिका(Rashmi Thackeray) रश्मी ठाकरे (Complaint against Rashmi Thackeray) यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केला असल्याची तक्रार पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी केली आहे.

रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या असल्याचे दिसत आहे

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आज शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात सपत्नीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यापैकी एका फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Chief Minister Uddhav Thackeray) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राष्ट्रध्वजाला सलाम करत आहेत. रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या असल्याचे दिसत आहेत.

कारवाई करावी अशी मागणी

या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे असे अ‍ॅड. पाटील यांचे म्हणणे आहे. राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत होते. त्यावेळी रश्मी ठाकरे स्तब्ध उभ्या होत्या. त्यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. (Insult to the national flag) त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

तक्रारदारानं तक्रारीत काय म्हटलंय?

तक्रारदार अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देताना डोक्यावर गांधी टोपी घातली नाही. पण याबद्दल माझा काही आक्षेप नाही, कोणी गांधी यांच्या विचारांचे तर कोणी गोडसे यांच्या विचाराला मान्यता देऊ शकतात. तो त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण प्रजासत्ताक दिनी रेड कार्पेटवर ध्वजवंदन करणारे उपस्थित असतात. यावेळी न विसरता सलामी द्यायची असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी या रेड कार्पेटवर ध्वजारोहणानंतर सलामी देत नाहीत. हे कोणते शहाणपण? त्यांना ध्वज संहिता आणि प्रजासत्ताक मान्य नाही का? सार्वजनिक जीवनात ध्वजसंहितेचा अपमान करणे हे हिंदुस्थानी भारतीय नागरिकांचा सार्वजनिकरित्या भावनांचा अपमान केल्यासारखे आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रगीताचा अपमान या संबंधी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडून अक्षम्य अपराध झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा -मैदानाला टिपू सुलतान नाव दिले तर भाजप राज्यभर आंदोलन करेल -चंद्रकांत पाटील

Last Updated : Jan 27, 2022, 4:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details