मुंबई -काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ( FIR Against Vivek Agnihotri ) विरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी भोपाली नागरिकांसंदर्भात ( Vivek Agnihotri Statement On Bhopali People ) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. भोपाली नागगरीकाना समलिंगी संबोधल्याबद्दल दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी वर्सोवा पोलिस ठाण्यात पत्रकार आणि सेलिब्रिटी मॅनेजर रोहित पांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. रोहित पांडे हे मुळचे भोपालचे नागरिक आहे.
FIR Against Vivek Agnihotri : काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल - विवेक अग्निहोत्री समलिंगी वक्तव्य
विवेक अग्निहोत्री यांनी ( FIR Against Vivek Agnihotri ) भोपाली नागरिकांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून ( Vivek Agnihotri Statement On Bhopali People ) त्यांच्याविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
'द काश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकाचे वादग्रस्त विधान : विवेक रंजन अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीत वादग्रस्त विधान केले होते. 'भोपाळी' या शब्दाचा अर्थ समलैंगिक असा असल्याचे त्यांनी सांगितले. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले होते. विवेक इथेच थांबले नाहीत, पुढे बोलताना ते म्हणाले की, मी भोपाळचा आहे, भोपाळीचा नाही. मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मी भोपाळमध्ये लहानाचा मोठा झालो, पण भोपाळी नाही. भोपाळी लोकांची शैली वेगळी आहे, ती मी तुम्हाला कधीतरी खासगीत समजावून सांगेन. ते म्हणाले की, कोणाला तरी सांगा, तो भोपाळी आहे, याचा सरळ अर्थ असा आहे की तो समलैंगिक आहे. म्हणजे नवाबी शौक असलेला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोणत्याही भोपाळीला विचारू शकता, असे वक्तव्य विवेक अग्निहोत्री यांनी केले होते.
हेही वाचा -अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाची ४१० दहा मिनिटे वाया; २ कोटी ८८ लाख रुपयांचा चुराडा