मुंबई - शिवसेना ( Shivsena ) नेत्या दीपाली सय्यद ( dipali sayyad ) यांनी भाजप महिला मोर्चाच्या ( BJP Mahila Morcha ) महिलांविरोधात ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद आणि भाजप महिला मोर्चातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ( Narendra Modi ) केलेल्या वक्तव्यानंतर हा वाद पेटला आहे.
गेल्या आठवड्यात दिपाली सय्यद आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजप दिपाली सय्यद यांच्याविरोधात आक्रमक झाली असून त्यांना घरात घुसून बदडून काढण्याचा इशारा दिला होता, त्यानंतर आता दिपाली सय्यद यांनी भाजप नेत्या उमा खापरे आणि त्यांच्या महिला साथीदारांनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
दिपाली सय्यद यांनी भाजपा महिला मोर्चातील अकरा महिलांविरूद्ध ओशिवारा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी यात, दिव्या ढोले, मनिषा जैन वर्षा डहाळे, रीदा रशिद, कविता देशमुख, प्रिया के. शर्मा, रिटा मखवाना, मंजु वैष्णव, दिपाली मोकाशी , प्रणीता देवरे आणि नयना वसानी यांचा समावेश आहे. भाजपच्या या सर्व महिलांंवर लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप महिला मोर्चाच्या दीपाली सय्यद यांच्या विरोधात देखील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवर कुठलीही कारवाई न केल्याने महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती आणि कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.
BJP Mahila Morcha: भाजप महिला मोर्चाच्या अधिकाऱ्यांविरोधात दीपाली सय्यद यांची तक्रार
मुंबई - शिवसेना ( Shivsena ) नेत्या दीपाली सय्यद ( dipali sayyad ) यांनी भाजप महिला मोर्चाच्या ( BJP Mahila Morcha ) महिलांविरोधात ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद आणि भाजप महिला मोर्चातील संघर्ष शिगेला पोहचला आहे.
dipali sayyad