मुंबई -घरगूती गॅस सीलिंडर पाठोपाठ सीएनजी, पीएनजीचे दरही वाढले ( CNG PNG prices hiked ) आहेत. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच दिवसागणित सर्व गोष्टी महाग होत जात आहे. सीएनजीच्या दरात 4 रुपयांनी ( CNG prices hiked by 4 rupees ) तर, पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ ( PNG prices hiked by 4 rupees ) झाली आहे. मंगळवारी रात्रीपासून ही दरवाढ लागू झाल्याचे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांच्या खिशाला कात्री -पेट्रोल, डिझेल असो किंवा घरगुती गॅस असो सर्वांच्याच किमती वाढल्यामुळे आगोदरच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. आता सीएनजी-पीएनजी दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने हा निर्णय घेतला असून सीएनजी, पीएनजी दरात अनुक्रमे चार आणि तीन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तीन रुपये वाढिसह सीएनजी प्रति किलो 80 रुपये तर चार रुपये वाढीसह पीएनजी 48.50 रुपये प्रति किलो दराने ग्राहकांना खरेदी करावा लागणार आहे. ही दरवाढ मंगळवारी रात्रीपासून लागू झाली आहे.
गॅस पुरवठ्यात कमतरता -स्थानिक पातळीवर गॅस पुरवठ्यात कमतरता निर्माण झाल्याने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. त्याशिवाय देशांतर्गत गॅसच्या किमती आधीच वाढल्या आहेत. या किमतीचा कंपनीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. परिणामी गरिब जनता महागाईने भरडली जात आहे.