मुंबई -संजय पांडे ( Mumbai CP Sanjay Pandey ) यांनी नुकताच मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी मुंबईकरांसाठी एक खुशखबर दिली आहे. आता मुंबईकरांची नो पार्किंगमधील वाहने पोलिसांकडून टो करण्यात येणार नाही. म्हणजेच नो पार्किंमधून वाहने उचलल्यानंतर वाहनधारकांचा होणार त्रास आता कमी होणार आहे.
मुंबईकरांना उद्देशून एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमधून त्यांनी वाहने उचलून नेणे थांबवत आहोत असे म्हटले आहे. मुंबईकरांनी जर नियमांचे पालन केले तर अशी कारवाई करणे थांबवली जाईल, असे म्हटले आहे. यातच रस्त्यांवर वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने अनेकवेळा वाहनधारक कळत नकळत वाहने नो पार्किंगमध्ये लावतात. मग पोलीस ते टो करून घेऊन जातात. यासंदर्भातच आता मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मोठे पाऊल उचलत वाहनधारकांना गोड बातमी दिली आहे. संजय पांडे यांनी ट्विट करत सांगितले आहे की, मुंबईत वाहतूक पोलिसांकडून वाहन टोईंग थांबण्यात आली आहे.