मुंबई : राज्यात पावसाने हाहाकार माजला आहे. अतिवृष्टी आणि पुराशी निगडीत दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणासह मुंबई, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात अतिवृष्टी व पुराचे थैमान बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुढे यावं आणि तातडीने जशी जमेल तशी मदत करावी, अशा आशयाचं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलं आहे.
Maharashtra Floods : पूरग्रस्तांना मदत करा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन - पूरग्रस्तांना मदत करा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
"आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल, तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोहोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी. महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये" असे पत्र राज यांनी कार्यकर्त्यांना लिहिले आहे.
Maharashtra Floods : पूरग्रस्तांना मदत करा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन