महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

म्हाडात शिवसेना-भाजपचे शीतयुद्ध शिगेला; मधू चव्हाण यांना डावलले - मधु चव्हाण बातमी

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने नुकतीच एक उच्चस्तरीय समिती बनवली आहे. या समितीत शिवसेनेच्या आमदारांना डावलण्यात आले होते, त्याचाच वचपा शिवसेनेने काढला असून भाजप नेते मधू चव्हाण यांना म्हाडाच्या आढावा बैठकीत डावलले आहे.

मधू चव्हाण

By

Published : Aug 24, 2019, 3:57 AM IST

मुंबई- म्हाडात शिवसेना-भाजपचे शीतयुद्ध शिगेला पोहोचले असून शुक्रवारी शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत खुद्द म्हाडा मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांना डावलण्यात आले. यामागे कारणही तसेच आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने नुकतीच एक उच्चस्तरीय समिती बनवली आहे. या समितीत शिवसेनेच्या आमदारांना डावलण्यात आले होते, त्याचाच वचपा शिवसेनेने काढला असून भाजप नेते चव्हाण यांना डावलले आहे.

शिवसेना-भाजपचे शीतयुद्ध शिगेला

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी म्हाडामध्ये बीडीडी चाळीच्या पुनर्वसन कामाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुंबईतील शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. यावेळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, ज्यांनी बीडीडी पुनर्विकासाठी जोर लावला, असे म्हाडा मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांना मात्र बैठकीत डावलण्यात आले. विशेष म्हणजे चव्हाण यांना या बैठकीचे आमंत्रण दिले नसल्याची माहिती समोर आली आहे.

मधू चव्हाण यांनी मुंबई मंडळाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रक्रियेस सुरुवात केली होती. यासाठी सर्वपक्षीय आमदार, नगरसेवकांच्या बैठकाही त्यांनी घेतल्या होत्या. सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व बीडीडी चाळीच्या पदाधिकाऱ्यांशी म्हाडाच्या कार्यालयात सविस्तर चर्चा करून बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाच्या कामाला गती दिली.असे असतानाच चव्हाण यांना आजच्या बैठकीत शिवसेनेने डावलले. युतीबाबत आमचं ठरलं आहे, असे वारंवार पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभेत करत असतात. मात्र, मित्र पक्ष असलेल्या भाजपला वगळून श्रेय घ्यायचे, हेच ठरलंय का ? अशी चर्चा दबक्या आवाजात म्हाडा कार्यलयात होत आहे.

चव्हाण यांनी सर्वप्रथम वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांमध्ये म्हाडाविषयी असलेला संभ्रम दूर करण्यासाठी त्यांच्या परिसरात जाऊन बैठका घेतल्या होत्या. संक्रमण शिबिराविषयी असलेली भीती दूर केली होती. तसेच २८ जून २०१७ पर्यंतच्या सर्व भाडेकरूंना अधिकृत करण्याची ग्वाही दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details