महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊतांना कुलाबा पोलीस स्टेशनचे समन्स - Phone Tapping Case

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रश्मी शुक्ला यांची दोन वेळा चौकशी देखील करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात आता शिवसेना नेते संजय राऊत यांना कुलाबा पोलीस स्टेशने समन्स पाठवला आहे. आज कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊत यांचा या प्रकरणात जबाब नोंदवण्यात येणार आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत
शिवसेनेचे नेते संजय राऊत

By

Published : Apr 8, 2022, 11:12 AM IST

मुंबई -फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रश्मी शुक्ला यांची दोन वेळा चौकशी देखील करण्यात आली. ( Summons Sanjay Raut In Phone Tapping Case ) त्यानंतर या प्रकरणात आता शिवसेना नेते संजय राऊत यांना कुलाबा पोलीस स्टेशने समन्स पाठवला आहे. आज कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊत यांचा या प्रकरणात जबाब नोंदवण्यात येणार आहे.

खडसेंची पोलीस स्टेशनकडून दोन तास चौकशी - आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररित्या शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग केल्या प्रकरणात मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातच गुरुवारी एकनाथ खडसे यांची कुलाबा पोलीस स्टेशनकडून दोन तास जबाब नोंदवण्यात आला होता. आज शिवसेना नेते संजय राऊत यांना देखील या प्रकरणात जवाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे.

शुक्ला यांची उच्च न्यायालयात धाव - आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर यापूर्वी पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये फोन टॅपिंग प्रकरणात सर्वात प्रथम गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना अंतरिम दिलासा देण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर रश्मी शुक्ला यांनी कुलाबा पोलीस स्टेशन आणि पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणात चौकशीला समोर गेल्या होते.

काय आहे प्रकरण ? -राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम (26) तसेच कलम (166)अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

फोन टॅप का केले त्यामागचे कारण अस्पष्ट - अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (जून 2019)मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु, असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये - रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातदेखील सर्वात प्रथम फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने (25 मार्च)पर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये येथे गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा -शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्तांवर आयकर विभागाची टाच, हवालामार्गे पैशांचा व्यवहार झाल्याचा संशय

ABOUT THE AUTHOR

...view details