महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Phone Tapping Case; रश्मी शुक्लांच्या विरोधात फौजदारी चौकशीच्या परवानगीसाठी कुलाबा पोलिसांचा न्यायालयात अर्ज - आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढल्या

महाविकास आघाडीचे सरकार असताना गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात येत होता. याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता कुलाबा पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फौजदारी चौकशी करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे.

IPS Rashmi Shukla
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला

By

Published : Aug 9, 2022, 10:38 PM IST

मुंबई -कथित फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कुलाबा पोलिसांनी ( Colaba Police File Petition In Court ) न्यायालयात रश्मी शुक्ला ( ( IPS Rashmi Shukla ) यांच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू करून सीआरपीसी कलमांतर्गत खटला चालवण्याची परवानगीसाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. या अर्जावर पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे.

खटला चालवण्यासाठी केंद्राची मिळावी मंजुरी -आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर मुंबईतील कुलाबा पोलिसांनी ( Colaba Police File Petition In Court )एस्प्लेनेड न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. शुक्लांविरोधात फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसीच्या कलम 197 अंतर्गत खटला चालवण्यासाठी केंद्राची मंजुरी मिळावी, अशी मागणी अर्जातून करण्यात आली आहे.

गुप्तचर विभागाने दिली होती तक्रार -राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना, राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांनी हे फोन टॅपींग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, ज्येष्ठ नेते तसेच सरकारी अधिकाऱ्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग ( Phone Tapping Case ) करून गोपनीय माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. महाराष्ट्र गुप्तचर विभागाने दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील बीकेसी सायबर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी शुल्कांविरोधात एप्रिल महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

न्यायालयाने शुक्लांना भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश -700 हून अधिक पानांच्या या आरोपपत्रात शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह किमान 20 लोकांचे जबाब नोंदवलेले आहेत. ज्यांचे फोन रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांनी महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख असताना बेकायदेशीरपणे टॅप ( Phone Tapping Case ) केले होते. त्यानंतर आता या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसीच्या कलम 197 अंतर्गत शुक्लांविरोधात केंद्रीय सेवेतील अधिकाऱ्याच्या कर्तव्याशी संबंधित कारवाई करण्यासाठी केंद्राची परवानगी आवश्यक आहे. म्हणून मुंबई पोलिसांनी अर्ज दाखल केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी 6 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

काय आहे प्रकरण -गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप ( Phone Tapping Case ) केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात ( Colaba Police File Petition In Court ) भारतीय टेलिग्राफ अॅक्टच्या कलम 26 तसेच भादंवी कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयाच्या तक्रारीवरून रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून 2019 मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप ( Phone Tapping Case ) झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ अॅक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु असे कोणतेही ठोस कारण नसताना रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले, त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details