महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ड्रग्जच्या खरेदीसाठी कोड वर्डचा वापर; आर्यनच्या Whats App चॅटमधून माहिती आली समोर - आर्यन खान व्हॉटस अॅप चॅट

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डींया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

cruise
कॉर्डींया द क्रूझ

By

Published : Oct 5, 2021, 5:52 PM IST

मुंबई - 'कॉर्डींया द क्रूझ'वरील ड्रग पार्टीवर एनसीबीने शनिवारी छापा टाकला होता. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आतापर्यत अकरा जणांना अटक झाली आहे. आर्यन खान सध्या एनसीबी कोठडीत असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. एनसीबीच्या चौकशीत आर्यन खान Whats App कोड वर्डचा वापर करून क्रिप्टोकरन्सीमार्फत ड्रग खरेदी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावरील ड्रग पेडलरपर्यंत पोहचले आहे.

हेही वाचा -Cruise Drug Case : आता एनसीबीच्या मदतीला अन्य राज्यातील अधिकारी

  • आर्यनच्या मोबाइलमधून धक्कादायक खुलासे -

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डींया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश आहे. सध्या आर्यन खानला न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला शनिवारी चेक इन करत असताना ताब्यात घेण्यात आले. अरबाजच्या शूजच्या सोलमध्ये ड्रग्ज लपवून आणले होते. जरी आर्यनच्या खिशातून किंवा पिशवीतून ड्रग्ज सापडले नसले, तरी ते ड्रग्ज फक्त आर्यन, अरबाज आणि त्यांच्या साथीदारांच्या वापरासाठी आणले होते, याचा पुरावा आर्यन आणि अरबाजच्या Whats App चॅटमध्ये सापडला आहे, ज्यामध्ये आर्यन हा अरबाज मर्चंटला ड्रग आणण्यास सांगत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, आर्यन खान Whats App कोड वर्डचा वापर करून क्रिप्टोकरन्सीमार्फत ड्रग्ज खरेदी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

  • पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला -

मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डींया द क्रूझवर संबंधित अधिकाऱ्यांकडून ज्या दिवशी छापा टाकला, त्या दिवशीचा मेनिफेस्टो मागवला आहे. यातून क्रूझवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील, रूम नंबर, त्यांच्या आय-कार्डचा तपशील, मोबाईल क्रमांकासह इतरही माहिती उपलब्ध होईल. क्रूझचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आले आहेत. याशिवाय या क्रूझवर ड्रग्ज डीलर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे कॉर्डींया द क्रूझवर 2 ऑक्टोबर झालेल्या पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला आहे. याशिवाय क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम यांना पुन्हा समन बजावत चौकशीसाठी बोलावले आहे.

हेही वाचा -Cruise Drug Case : 'कॉर्डींया द क्रूझ'चा सीईओ जुर्गन बेलोमला एनसीबीने बजावला दुसऱ्यांदा समन्स!

ABOUT THE AUTHOR

...view details