मुंबई- मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून ( Gate Way Of India ) समुद्रात तरुणी तिच्या मित्रासोबत आज रविवार रोजी बोटीवर फिरायला गेली होती. मात्र, बोटमध्ये फिरत असताना आलेल्या मोठ्या समुद्राच्या लाटेमुळे तरुणी बोटमधून खाली ( Women In Boat Fell Into Sea ) पडली. या समुद्रात बुडणाऱ्या एका मुलीची सुटका करण्यात आली आहे. कोस्टल पोलीस आणि कुलाबा पोलिसांनी तरुणीला सुखरुप बाहेर ( Costal Colaba Police Save lives ) काढले. मोठी लाट बोटीला धडकल्यामुळे तोल जाऊन तरुणी पाण्यात पडली होती.
अन् मोठा अनर्थ टळला..
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून काही अंतरावर समुद्रात पडलेली ही तरुणी आपल्या मित्रांसोबत फिरायला गेली होती. रविवार असल्याने गेट ऑफ इंडियावरून मोठ्या प्रमाणात मुंबईकर समुद्रात फिरण्यासाठी जात असतात. आपल्या मित्रांसोबत ती तरुणी फिरायला गेली होती. त्यावेळी ती समुद्रात पडली होती. या तरुणीला कोस्टल पोलीस आणि कुलाबा पोलिसांकडून सुखरुप बाहेर काढल्यानंतर तिला गेट ऑफ इंडिया इथे आणण्यात आले आहे. कोस्टल पोलीस आणि कुलाबा पोलिसांनी तरुणीला सुखरुप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.