महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CNG will be cheaper in Maharashtra : राज्यात 1 एप्रिलपासून सीएनजी स्वस्त होणार.. व्हॅटमध्ये कपात

सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन ( CNG cheaper Maharashtra ) स्वस्त होणार आहे.

CNG cheaper Maharashtra
सीएनजी स्वस्त महाराष्ट्र

By

Published : Mar 27, 2022, 8:49 AM IST

Updated : Mar 27, 2022, 1:04 PM IST

मुंबई -उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी ( CNG cheaper Maharashtra ) इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून, याचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे.

पत्र

हेही वाचा -Sadabhau Khot Threat call : एसटी संपावरून सदाभाऊ खोत यांना धमकीचा फोन

१ एप्रिलपासून नवे दर :सीएनजीचे कमी झालेले नवे दर दि. १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘सीएनजी व्हॅट’ कपात निर्णयाचा टॅक्सी, ऑटो, प्रवासी वाहतूकदारांसह सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. त्यासोबत प्रदूषणाचे प्रमाण सुद्धा कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पेट्रोल - डिझेलवरील कर कपातीचे काय :सीएनजी वरील व्हॅट कपात करण्याचा निर्णय जरी अजित पवार यांनी अर्थमंत्री या नात्याने घेतला असला तरी, पेट्रोल व डिझेलवरील कर कमी कधी केला जाणार? याबाबत विचारणा होत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल - डिझेलवरील कर कमी केल्यानंतर इतर राज्यांनीसुद्धा कर कमी केले. परंतु, महाराष्ट्रात अद्याप ते कमी करण्यात आले नाहीत. याबाबत भाजपने नेहमी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यातच खुद्द काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा या संदर्भात राज्याने सुद्धा पेट्रोल - डिझेलच्या करात कपात करावी, अशी मागणी सातत्याने केली आहे. परंतु, त्यास अजून सकारात्मक प्रतिसाद सरकारकडून विशेष करून अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आला नाही.

हेही वाचा -Earth Hour 2022 : निसर्ग आणि ग्रहाच्या समर्थनार्थ मुंबई पालिकेवरील दिवे बंद

Last Updated : Mar 27, 2022, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details