महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CNG Rate Hike : सीएनजी दरात दहा महिन्यांत चौदा रुपयांची वाढ; रिक्षा, टॅक्सी चालक नाराज - सीएनची दरवाढीवर नाराजी

गेल्या दोन महिन्यांत सीएनजीच्या दरांमध्ये तिसऱ्यांदा वाढ(CNG Price Hike) झाल्याने वाहनचालक नाराज आहेत. सीएनजीच्या दरांमध्ये प्रतिकिलोमागे तब्बल ३ रुपये ९६ पैसे अर्थात जवळपास चार रुपये दर वाढले आहेत. त्यामुळे आता मुंबईत(Mumbai CNG Rates) सीएनजीचे दर ६१ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत.

CNG Rate Hike
CNG Rate Hike

By

Published : Nov 28, 2021, 12:59 PM IST

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलची भरमसाठ दरवाढ(Fuel Price Hike) झाल्यानंतर विरोध बघता पेट्रोल आणि डिझेलचे काही प्रमाणात दर कमी करण्यात आले. मात्र आता सीएनजी(CNG Price Hike) दरातही देखील मोठी वाढ झाली आहे. मुंबईत सीएनजी वाहनांची संख्या जास्त असून येथील सार्वजनिक वाहतूक करणारी अनेक वाहनेही सीएनजीवर चालतात. गेल्या दोन महिन्यांत सीएनजीच्या दरांमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाल्याने वाहनचालक नाराज आहेत. सीएनजीच्या दरांमध्ये प्रतिकिलोमागे तब्बल ३ रुपये ९६ पैसे अर्थात जवळपास चार रुपये दर वाढले आहेत. त्यामुळे आता मुंबईत सीएनजीचे दर ६१ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत.

मागील दोन महिन्यांत तिसऱ्यांदा सीएनजीची दरवाढ झाली आहे. घरगुती वापरासाठी पाईपद्वारे पुरविण्यात येणाऱ्या गॅसचे दरही प्रतियुनिट २ रुपये ५७ पैशांनी वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे या गॅससाठी आता मुंबईतील घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट ३६ रुपये ५० पैसे इतका दर मोजावा लागणार आहे.

वर्षभरात किती वाढले दर?
सीएनजीच्या दरामध्ये मोठी वाढ काही दिवसांमध्ये दिसून आली. गेल्या दहा महिन्यांचा जर आलेख पाहिला तर तब्बल 14 रुपयांची वाढ एका किलोमागे झाली आहे.

घर कसे चालवायाचे?
मुंबईतील सर्व रिक्षा सीएनजीवर चालतात. यामुळे ही दरवाढ आमच्यासाठी खिशाला झटका देणारी आहे. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण सार्वजनिक आणि खासगी वाहतूक ही सीएनजीवर अवलंबून आहे. यामुळे हे दर कमी केले पाहिजे. गेल्या दहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात हे दर वाढले आहेत. एकीकडे लॉकडाऊनमुळे धंदा नव्हता. तर दुसरीकडे या दरवाढीमुळे रिक्षा कशी चालवायची असा प्रश्न आमच्यासमोर आहे, असे रिक्षाचालक रमेश साळवी यांनी सांगितले.

कोणावर होणार परिणाम?
मुंबईत सर्वाधिक ऑटोरिक्षा चालक आणि टॅक्सी चालक सीएनजीवर वाहने चालवितात. यासोबतच बेस्टच्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील सीएनजीचा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे. सीएनजीच्या वाढलेल्या दरांवरुन नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

संघटना संपाच्या तयारीत
मुंबईतील सर्व टॅक्सी या सीएनजीवर चालत असल्यामुळे हा फटका बसत आहे. ही वाढ चालकांनाही परवडणारी नसल्याने टॅक्सीच्या भाडेदरात किमान पाच रुपये वाढ करावी, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. वाढ न केल्यास संपावर जाण्याचा इशारा युनियनने दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details