मुंबई -गॅस पाईपलाईन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्याचे कारण पुढे करत महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) किंमतीत प्रतिकिलो २.५८ रुपयांची वाढ केली आहे. याशिवाय महानगरने घरगुती पीएनजीची किंमतही ०.५५ रुपयांनी वाढविली आहे. मंगळवारी, १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या वाहनाच्या चालकांना आणि गृहिणींना याच्या मोठा फटका बसणार आहे.
मुंबईत सीएनजीसह घरगुती गॅसही महागला, मध्यमवर्गीयांना फटका - मुंबई सीएनजी गॅस भाववाढ बातमी
मुंबई आणि उपनगरात सीएनजीची ही दर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आर्थिक फटका बसणार आहे. या दरवाढीने सर्वाधिक नुकसान टॅक्सी व रिक्षा चालकांना सहन करावे लागेल, अशी प्रतिक्रिया रिक्षा व टॅक्सी चालक संघटनेने व्यक्त केल्या आहेत. याउलट घरगुती पीएनजी दरवाढीने अल्पउत्पन्न व मध्यम वर्गियांचे बजेट पुरते कोलमडणार आहे.
आज रात्रीपासून नवे दर लागू
एमजीएलने दिलेल्या माहितीनुसार,गॅस पाइप लाईन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्चाचे अंशतः आच्छादन करण्यासाठी आपल्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) किंमती २ रुपये ५८ पैशांची आणि घरगुती पीएनजी किंमतीत ०.५५ पैशांनी वाढविले आहे. ही दरवाढ १३ जुलै २०२१ च्या मध्यरात्री / १४ जुलै २०२१ सकाळी मुंबईत लागू होणार आहे. त्यानुसार, मुंबई आणि महानगरात वाहन चालकांना एका किलो सीएनजीसाठी ५१.९८ रुपये मोजावे लागतील. याउलट घरगुती पीएनजीच्या पहिल्या स्लॅबसाठी ३०.४० रुपये, तर दुसऱ्या स्लॅबसाठी ३६ रुपये प्रति एससीएम आकारले जातील.
टॅक्सी चालकांना बसणार फटका
सततच्या इंधन दरवाढीमुळे पेट्रोल व डिझेल दर गगनाला भिडलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ पोहचत आहे. आता मुंबई आणि उपनगरात सीएनजीचे ही दर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आर्थिक फटका बसणार आहे. या दरवाढीने सर्वाधिक नुकसान टॅक्सी व रिक्षा चालकांना सहन करावे लागेल, अशी प्रतिक्रिया रिक्षा व टॅक्सी चालक संघटनेने व्यक्त केल्या आहेत. याउलट घरगुती पीएनजी दरवाढीने अल्पउत्पन्न व मध्यम वर्गियांचे बजेट पुरते कोलमडणार आहे.
भाडेवाढीचा आता फायदा नाही
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २२ फेब्रुवारी २०२१ च्या बैठकीत ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रिक्षाचे भाडे १८ वरून २१ रुपये करण्यात आले होते. तर टॅक्सीचे २२ रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळालेला होता. मात्र आता सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा टॅक्सी चालक अडचणी सापडलेले आहे. त्यामुळे भाडे वाढीचा फायदा आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मिळणार नाही उलट सीएनजीसाठी त्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे अशी, प्रतिक्रिया रिक्षाचालक-मालक संघटनेकडून देण्यात आलेली आहे.