मुंबई- रोजच्या इंधन दरवाढीमुळे सध्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसत आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने या इंधनावरील वॅट कमी करण्यात आला होता. यामुळे कुठे थोडा दिलासा मिळाला होता न होता तेच आता केंद्राने नॅचरल गॅस विक्री किमतीत 110 टक्क्यांची वाढ केल्याने सीएनजीच्या ( Compressed Natural Gas) किमतीत पुन्हा एकदा 5 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र गॅस लिमिटेडची घोषणा -महाराष्ट्र गॅस लिमिटेडने या संदर्भात घोषणा करताना सांगितले आहे की, "वाहनांच्या इंधन दरात सतत वाढ होत असल्याने गॅस टँकर दळणवळणात मोठा खर्च येत आहे, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हे दर वाढवावे लागत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गॅस लिमिटेडच्या वतीने ( Maharashtra Gas Limited ) देण्यात आली.