मुंबई - राज्यात तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवला जातो आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले असून उद्योग क्षेत्र, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, अर्थचक्र आणि जीवनचक्राची गती कायम कशी राहील, असे नियोजन करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपरमुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, आरोग्यसंचालक रामस्वामी यांच्यासह पोलीस महासंचालक संजय पांडे, सीआयआयचे पश्चिम विभागाचे चेअरमन त्यागराजन, महाराष्ट्र चेअरमन सुधीर मुतालिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणची गर्दी थांबवा
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला केला आहे. दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. तोपर्यंत तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या साडे आठ हजार ते नऊ हजारावर स्थिरावली आहे, अजूनही ती त्या खाली जातांना दिसत नाही. उलट काही जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढतांना दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. अशा स्थितीत तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आरटीपीसीआर चाचण्याही वाढवा, पर्यटनस्थळी होणारी गर्दी तातडीने थांबवा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
ऑक्सिजन निर्मिती वाढवा
जगातील अनेक देशात तिसरी लाट येण्यास सुरुवात झाली आहे, तसे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीरही केले आहे. ब्रिटनसारख्या देशात रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ज्या देशात लसीकरण झाले त्या देशातही पुन्हा नव्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे आताच्याच कालावधीसाठी नाही तर पुढील एक दोन वर्षासाठी आवश्यक आहे. केंद्र सरकारने ही तिसऱ्या लाटे संदर्भात सर्व राज्यांना तशा सुचना दिल्या आहेत. राज्यात आजघडीला १३०० मे.टन ऑक्सीजन निर्मिती होते. तर तिसऱ्या लाटेत दर दिवशी ४००० ते ४५०० मे.टन ऑक्सीजनची महाराष्ट्राला गरज लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे ऑक्सीजन निर्मितीला वेग द्यावा, राज्यातील ऑक्सीजन साठा पुर्ण क्षमतेने भरावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.
नियमांची कडक अंमलबजावणी करा