हैदराबाद - देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. या व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सरकारच्यावतीने निरंतर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी सरकारने देशभरात अनेक प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( आयसीएमआर ) आणि डिपार्टटमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (डीएचएमआर) यांनी कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना परवानगी दिली आहे.
हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांची जागतिक आरोग्य संघटनेला धमकी, म्हणाले..
आयसीएमआरने म्हटलंय की, आयसीएमआरच्या बायोटेक्नॉलॉजी विभाग (डीबीटी), डिपार्टमेंट ऑफ सायन्स एँड टेक्नॉलॉजी (डीएसटी), इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( आयसीएमआर ) आणि डिपार्टमेंट ऑफ एनर्जी (डीएई ) यांच्या अंतर्गत असलेल्या प्रयोगशाळामध्ये चाचणी करण्यास कोणतीच हरकत नाही. आयसीएमआर या संस्थांना परिक्षण करण्यास मंजूरी देणार नाही. तर या संस्था ज्या संघटनांसोबत काम करीत आहेत त्यांना यांच्याकडून परवानगी मिळेल. भारत सरकारचे सचिव या संबंधित विभागांना योग्य चाचणी सुरू करण्यासाठी संमती मागू शकतात. कारण या प्रयोगशाळांची जबाबदारी संबंधित विभागांजवळ आहे, आयसीएमआरकडे नाही. परिक्षण सुरू करण्यापूर्वी या संस्थांना सुरक्षेचे उपाय योजन्याचा आयसीएमआरने सल्ला दिलाय.
चाचणी केंद्रांसाठी आयसीएमआरच्या सूचना
आयसीएमआरने म्हटलंय की, कोव्हिड १९ हा उच्च संक्रमकता असणारा रोग आहे. यासाठी चाचणी करताना प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच नमुणे तपासणीसाठी देण्यात यावेत.
विषाणुजनित (वायरोलॉजिकल) निदान (डायग्नोस्टिक) करण्यासाठी आण्विक जैव विज्ञानासहित जैव सुरक्षा स्तर -२ (BSL-2) ची सुविधा प्रयोगशाळेत उपलब्ध असली पाहिजे.
प्रयोगशाळेत कामकाजासाठी कॅलिब्रेटेड बायोसेफ्टी कॅबिनेट (calibrated Bio-safety cabinet) 2 A / 2B वर उपलब्ध असली पाहिजे.
आरएनए निष्कर्षासाठी कोल्ड सेंट्रीफ्यूज / माइक्रोफ्यूज असणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळांध्ये कामकाजासाठी रियल टाइम पीसीआर मशीन असणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळांमध्ये जैव सुरक्षा आणि जैव विविधता याची चांगली समज असणारे कर्मचारी असायला हवेत.