मुंबई - सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसले आणि युती तुटली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाली व शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला. त्यानंतर लगेच 'सीएमओ महाराष्ट्र' CMO Maharashtra ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरील देवेंद्र फढणवीस यांचा फोटो काढून त्याठिकाणी मंत्रालयाचा फोटो लावण्यात आला आहे.
#CMO ट्विटरवरून फडणवीसांचा फोटो चेंज...फेसबुकवर मात्र तोच
सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
हेही वाचा -'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्यावी'
दरम्यान, सरकारने घेतलेले सर्व निर्णय, त्याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. त्यासाठी त्यांचे फेसबुक आणि ट्विटरवर अकाऊंट आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना CMO Maharashtra या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचा फोटो होता. आता CMO Maharashtra या ट्विटर अकाऊंटवरील फडणवीसांचा फोटो हटवून त्याठिकाणी मंत्रालयाचा फोटो लावण्यात आला आहे. मात्र, CMO Maharashtra च्या फेसबुक अकाऊंटवरून अजून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो काढण्यात आलेला नाही. त्यामुळे तो काधी काढला जातोय हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.