महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पहिल्या स्वदेशी आणि विनाचालक मेट्रोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण - cm thackeray news

बंगळुरूत तयार करण्यात आलेली पहिली स्वदेशी बनावटीची आणि ड्रायव्हरलेस मेट्रो गाडी काल (28 जानेवारी) रात्री उशिरा मुंबईत दाखल झाली आहे.

metro
metro

By

Published : Jan 29, 2021, 4:41 PM IST

Updated : Jan 29, 2021, 8:53 PM IST

मुंबई - मेट्रो 2अ (दहिसर ते डी. एन. नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) य दोन मेट्रो मार्गावर चालवल्या जाणाऱ्या मेट्रो गाड्या बंगळुरूमध्ये तयार करण्यात येत आहेत. त्यानुसार बंगळुरूत तयार करण्यात आलेली पहिली स्वदेशी बनावटीची आणि ड्रायव्हरलेस मेट्रो गाडी काल (28 जानेवारी) रात्री उशिरा मुंबईत दाखल झाली आहे. तर आज चारकोप येथील मेट्रो कारशेडमध्ये या गाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे ही उपस्थित होते. दरम्यान आता लवकरच मेट्रो 2अ आणि मेट्रो 7 मार्गावर ट्रायल रन घेत हे मार्ग मेपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत दाखल करणे शक्य होणार असल्याचे म्हटले जात आहे. चारकोप मेट्रो डेपो संचलन आणि नियंत्रण केंद्र, ग्रहण उपकेंद्राचे उद्घाटन आणि ब्रँडिंग मॅन्युअलचे अनावरण ही यावेळी करण्यात आले.

84 गाड्या होताहेत तयार

आत्मनिर्भरता आणि चिनी कंपन्यांवर बहिष्कार यामुळे एमएमआरडीएने भारतातच मेट्रो गाड्या तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बंगळुरुतील बीईएमएल कंपनीला 84 गाड्या अर्थात 576 डबे तयार करण्याचे 3015 कोटी रूपयांचे कंत्राट या कंपनीला देण्यात आले. त्याप्रमाणे आता या कंपनीने पहिली गाडी तयार करत 23 जानेवारीला बंगळुरूतून मुंबईसाठी रवाना केली होती. ती गाडी अखेर गुरुवारी रात्री उशिरा मुंबईत दाखल झाली आहे. तर लवकरच आणखी 10 गाड्या मुंबईत येणार आहेत. या 11 गाड्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 वर धावणार आहेत.

स्वदेशी मेट्रो गाडीची वैशिष्ट्ये

  • 1. सर्व डबे वातानुकूलित असून यात स्वयंचलित दरवाजे आहेत. अद्ययावत पॅसेंजर इन्फॉर्मेशन यंत्रणाही यात कार्यान्वित आहे.
  • 2 अँटी स्कीडिंग पृष्ठभागामुळे कुणीही घसरून पडणार नाही.
  • 3. अद्ययावत अग्निरोधक यंत्रणा असलेल्या गाड्या.
  • 4. सीसीटीव्ही कॅमऱ्यांची सर्व डब्यावर नजर.
  • 5. सायकल ठेवण्यासाठी प्रत्येक डब्यात दोन स्टॅण्ड
  • 6. अपंग-वृद्धांना व्हिलचेअर सह प्रवास करता यावी, अशी व्यवस्था.
  • 7. या मेट्रो गाडीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी ड्रायव्हर लेस आहे. म्हणजे या मोटरमन नसेल आणि ती विना मोटरमन चालेल.
  • 8. ताशी 80 किमी वेगमर्यादा.
  • 9 वेग नियंत्रण आणि सुरक्षेसाठी अद्ययावत व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (व्हीव्हीव्हीएफ), ट्रेन कंट्रोल अँण्ड मॅनेजमेंट सिस्टिमसह विविध प्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान या यंत्रणेत आहे.
  • 12. इंटरनेटच्या वापरासाठी प्रत्येक डब्यात ऑप्टिकल फायबरचे नेटवर्कही आहे. या डब्यांचे डिझाईन ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य देणारे असून वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला जाईल.
Last Updated : Jan 29, 2021, 8:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details