मुंबई - भोंगे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज्यात राजकीय कुरघोड्या वाढल्या आहेत. त्यामुळे विरोधकांचा समाचार घेण्यासाठी येत्या १४ मे ला शिवसेनेची तोफ बिकेसी येथे धडाडणार आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर देणार आहेत. यामुळे या सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Uddhav Thackeray's Rally In Mumbai: मुंबईत धडाडणार शिवसेनेची तोफ ; उद्धव ठाकरे यांची १४ मेला होणार जाहीर सभा
राज्यात मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसावरुन राजकारण तापले आहे. त्यामुळे विरोधकांचा समाचार घेण्यासाठी येत्या १४ मे ला शिवसेनेची तोफ बिकेसी येथे धडाडणार आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर देणार आहेत.
विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार प्रत्युत्तर . .गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसावरून राजकारण तापले आहे. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट धरला. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. किरीट सोमय्यांच्या गाडीवर चप्पल, बाटल्या फेकण्यात आल्या. वातावरण तंग झाले असतानाच मनसे - भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा तापवला जात आहे. ३० एप्रिलला राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे ऑनलाइन संवाद साधणार आहेत. तसेच मुंबईतील सभेच्या नियोजनावर चर्चा केली जाणार आहे. मात्र ही सभा वादळी ठरणार असल्याचे बोलले जाते.
राज ठाकरे औरंगाबादला तर देवेंद्र फडणवीस पुण्यात घेणार सभा -मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट औरंगाबादला सबा घेऊन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेचे टीझरही जारी करण्यात आले आहे. त्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे १ मे रोजी पुण्यात सभा घेऊन आघाडी सरकारची पोलखोल करणार आहेत. तर दुसरीकडे किरीट सोमय्यांकडून आरोपांचे सत्र सुरू आहे. हिंदुत्व, केंद्रीय कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिकेसी येथे सभा घेणार आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच शिवसेना भवन येथे बैठक झाली.