मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गानकोकिळा लता मंगेशकर यांची ब्रँच क्रँडी रुग्णालयात जावून भेट घेतली. त्यांना छातीमध्ये झालेला प्रादूर्भाव आणि श्वसनासंबंधीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी रुग्णालयात जावून लता मंगेशकर यांची भेट घेतली. चालू महिन्याच्या प्रारंभी दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील रुग्णालयात जावून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांची तब्येत स्थिर असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले होते.