मुंबई- कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांच्या निधनामुळे एक सच्चा कार्यकर्ता व मनमिळावू लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.
ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, राजेंद्र देवळेकर यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. धडाडीचे शिवसैनिक अशी ओळख असणारे देवळेकर या कोरोना काळातही अनेकांच्या मदतीला धावून गेले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास वाटचालीत त्यांचा निश्चितच मोठा वाटा आहे.
'राजेंद्र देवळेकर यांच्या निधनाने सच्चा शिवसैनिक गमावला' - Kalyan Dombivali Ex mayor Rajendra Devlekar
कल्याण डोबिंवली महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. कोरोनाच्या काळातही नगरसेवक देवळेकर अनेकांच्या मदतीला धावून गेले होते.

उद्धव ठाकरे
कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे आज निधन झाले. कल्याण-डोंबिवलीतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती.