महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना लस सर्वसामान्यांना कधी? मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात... - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पहिली लस ही कोरोना योद्ध्यांना दिली जाणार आहे. मात्र ती सर्व सामान्यांना कधी दिली जाणार या बाबत संभ्रम असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, पुढील काही महिन्यात ती सर्वसामान्यांना दिली जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अजून दोन तीन कंपन्या कोरोना लस पुरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांची लस शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लसीचा मोठा साठा उपलब्ध होईल.

CM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Jan 16, 2021, 1:22 PM IST

Updated : Jan 16, 2021, 5:05 PM IST

मुंबई:-मागील कित्येक दिवसांपासून लस येणार लस येणार असे म्हटले जात होते. आज अखेर लस आली असून हा दिवस क्रांतिकारकच म्हणावा लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते बीकेसी कोविड सेंटर येथे लसीकरण मोहीमेच्या शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. सुरूवातीला कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र सर्वसामान्यांना लस कधी मिळणार या बाबत संभ्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना लस सर्वसामान्यांना कधी? मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात...

सर्वसामान्यांना लस कधी

लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पहिली लस ही कोरोना योद्ध्यांना दिली जाणार आहे. मात्र ती सर्व सामान्यांना कधी दिली जाणार या बाबत संभ्रम असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र पुढील काही महिन्यात ती सर्वसामान्यांना दिली जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अजून दोन तीन कंपन्या कोरोना लस पुरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांची लस शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लसीचा मोठा साठा उपलब्ध होईल.

कोरोना योद्ध्यांना मानाचा मुजरा

आता लस घेऊन आपल्याला या संकटाला दूर करायचे आहे. तेव्हा कॊरोना काळात आणि आता लसीकरण मोहिमेत ही महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कॊरोना योध्याना माझा मानाचा मुजरा असे ठाकरे यावेळी म्हणाले. कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना जीवाची बाजी लावली. त्यांच्या कार्याचे त्यांनी कौतूक केले. अडचणीच्या काळात साथ दिल्याने त्यांनी त्यांचे आभार मानताना पुढील काळातही असेच सहकार्य करण्याचे आवाहनही केले.

लशीबाबत शंका नसावी

भारतात कोविशील्ड आणि कोव्हाक्सिन अशा दोन लसी दिल्या जात आहेत. पण या लशीबाबत अनेकांनामध्ये थोडा संभ्रम आहे. लस सुरक्षित आहे का असे प्रश्न आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी मात्र लसीबाबत शंका उपस्थित करण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकार ठरवते कोणती लस द्यायची. त्यानुसार सर्व खात्री करूनच या लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. तेव्हा याबाबत शंका घेण्याची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

मास्क हीच उत्तम लस
लस आली आहे, तेव्हा आता काही दिवसात कॊरोनाचे संकट जाईल. पण आता लस आली, लस घेतली म्हणून लगेच संकट टळले असे नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरायचा आहे. खरं तर मास्क हीच लस आहे. तेव्हा मास्क वापरा असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. दरम्यान डॉ मधुरा पाटील यांना पहिली लस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत देण्यात आली. तर डॉ मनोज हे लस घेणारे दुसरे कॊरोना योद्धे ठरले. दरम्यान नोंदणीनुसार पालिकेच्या आरोग्य विभागातील परिचारिका स्नेहल राणे यांची नोंद लस घेणाऱ्या पहिल्या कॊरोना योध्या म्हणून झाली होती. पण कार्यक्रमावेळी बीकेसी कोविड सेंटरमधील दोन डॉक्टरांना आधी लस देण्यात आली. मुळात या कार्यक्रमात नियोजनाचा मोठा अभाव दिसून आला. त्यामुळेही हा गोंधळ दिसून आला.

Last Updated : Jan 16, 2021, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details