मुंबई -शिवसेनेच्या राज्यभरातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. या बैठकीत शिवसेना बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी गावा-गावात शिवसेना पोहोचविण्यासाठी शिवसंपर्क मोहीम सुरू करा असा कार्यक्रम दिला आहे. यासाठी शिवसंपर्क अभियान 12 जुलै ते 24 जुलैदरम्यान राबवण्यात येणार आहे.
कोरोनामुक्त गाव अभियान तळागाळात पोहोचविण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश
या बैठकीत शिवसेना बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी गावा-गावात शिवसेना पोहोचविण्यासाठी शिवसंपर्क मोहीम सुरू करा असा कार्यक्रम दिला आहे. यासाठी शिवसंपर्क अभियान 12 जुलै ते 24 जुलैदरम्यान राबवण्यात येणार आहे.
दोन सत्रात बैठक
ही बैठक हे दोन सत्रात घेण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना घराघरात पोहोचविण्यासाठी मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शिवसैनिक सर्वसामान्य लोकांच्या घराघरात शिवसेना पोहोचविणार आहे. माझा गाव कोरोनामुक्त गाव आपल्या गावात ही मोहीम प्रत्येक शाखा प्रमुखाने आपल्या गावात राबवावी. महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायती प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभागात बैठका घ्याव्या, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये. गावात राहूनच कोरोनामुक्तीची मोहीम राबवावी, असे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.