मुंबई -राज्यात सध्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. आज सोमवारी मुंबईत राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, आपल्याला दोन चाकी चालवायची सवय नाही. मात्र, सध्या तीन चाकी सरकार चालवतोय, असे बोलत भाजपला टोला लगावला आहे.
राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान शुभारंभ सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... हेही वाचा... 'आप'च्या प्रचारगीतामध्ये मनोज तिवारी, भाजपने मागितली 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई
'सरकार या नात्याने मी नियम पाळायचे प्रयत्न करतोय. तीन चाकाची असेल पण गाडी चालतोय. गाडी जो चालवतो त्याचा कंट्रोल असणे महत्वाचे आहे. काही लोक चार चाकी गाडी चालवत आहेत. मात्र, त्यातील अनेकजण आपटले जात आहेत', असे बोलत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
हेही वाचा... आव्हाड म्हणतात ते दोघेच एकमेकांचे शनि; तर शनिदेवालाच 'यांचा' शनि लागायचा बच्चू कडूंचा टोला
आज सोमवारी मुंबईत 31 व्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान - 2020 चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री अनिल परब व राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
हेही वाचा... 'आमचा सनी हरवला' पठाणकोटमध्ये लागले पोस्टर्स
वर्षातील 365 दिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी कौतुक केले. रस्ते सुरक्षा जनजागृती सप्ताहाचा उपयोग वर्षभर झाला पाहिजे. रस्ते सुरक्षेचे महत्व घरातल्यांनी लहान मुलांना पटवून दिल्यास, आपले काम 100 टक्के पूर्ण होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा... 'छत्रपतींशी तुलना करु पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही'
पोलिसांचा पुर्वी धाक होता, दरारा होता. परदेशात पोलीस दिसत नसले, तरी चालकांना त्यांचा धाक दरारा असतो. आपल्याकडे नव्या यंत्रणा आणून तसा धाक, दरारा निर्माण करणे गरजेचे असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. सध्या आपल्या येथे वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे, असेही ठाकरे म्हणाले. तसेच अपघाता वेळी जीवनदूत पोलीस यंत्रणा आधी पोहचण्यापूर्वी काम करतात, याबद्दल उद्धव ठाकरे यांनी अशा जीवनदूतांचे आभार मानले.