मुंबई -पर्यटन वाढीसोबत विकासाच्या हव्यासापोटी आपलं पर्यावरण नष्ट न करता आहे त्या स्थितीत त्याचा विकास करण्याची आवश्यकता आहे. तसेच आहे ते जपणं आणि हवंय ते देणं हिच पर्यटन विकासाची खरी संकल्पना असावी, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
पर्यटनवाढीसाठी पर्यावरणाचा आहे त्या स्थितीत विकास करण्याची आवश्यकता - मुख्यमंत्री - cm uddhav thackeray on world world tourism day
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की सन २०१३ साली छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये मेगा पर्यटन संकुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने काढलेली डेटा पुस्तिका हे एक राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टिने महत्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्राला अनेक गडकिल्ल्यांचा वारसा मिळालेला आहे. त्याची जपवणूक करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन डेटा बँकचे विमोचन तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक व खारघर येथील दोन पर्यटक संकुलांचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण सोहळा आज पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीपराव बनकर, माजी खासदार समीर भुजबळ, आदी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की सन २०१३ साली छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये मेगा पर्यटन संकुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने काढलेली डेटा पुस्तिका हे एक राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टिने महत्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्राला अनेक गडकिल्ल्यांचा वारसा मिळालेला आहे. त्याची जपवणूक करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. नाशिक बोट क्लबचा पूर्ण क्षमतेने विकास व्हावा व पर्यटन आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. वन्य प्राणी, सूक्ष्मजीव हा आपल्या राज्याचा ठेवा असून ते मोठे वैभव आहे. त्याची जपणूक करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करणे हेच आजच्या जागतिक पर्यटन दिनाचे खरे औचित्य ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईतील गिल्बर्ट हिलवर बाराव्या शतकातील मंदिर असून या टेकडीचे वैशिष्ट्ये म्हणजे ती ज्या खडकापासून बनली आहे तशा तशा खडकातल्या जगात केवळ दोनच टेकड्या आहेत. एक मुंबईतील अंधेरीच्या बाजूची आणि दुसरी अमेरिकेतील. दोघांचा दगड एक आहे. पण अमेरिकेने या वास्तूची जपणूक वर्ल्ड हेरिटेज म्हणून केली आहे. आपलेही अशा ठेव्यांची जपणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाने पर्यटन विभागाच्या विकासासाठी पहिला निधी रायगडासाठी 600 कोटीच्या रुपात मंजूर केला. त्यातील 20 कोटी निधी वितरीतही केला आहे. गेल्या काही दिवसात या खात्याने चांगले काम केले आहे. पर्यटनाचा विकास करताना राहण्याची खाण्याची, पोहोचण्याची उत्तम, सोय असायला हवी. यासाठी पर्यटनाचे एक स्वतंत्र पॅकेज करण्याबाबतची सूचनाही यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा नावलौकीक निर्माण करणार - आदित्य ठाकरे
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की राज्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असून जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा नावलौकिक निर्माण करण्यास प्राधान्य आहे. जागतिक पातळीच्या संकल्पना नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून राबविल्यात जात आहे. त्यात बोट क्लब व ग्रेप पार्क रिसॉर्टचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.