मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केल्यानंतर मराठा समाजातर्फे आज सोलापुरात आंदोलन केले जात आहे. मराठा आरक्षण आणि आंदोलन या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने ज्येष्ठ विधिज्ञांसोबत मराठा आरक्षणप्रश्नी वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि विधिज्ञ यांच्यासोबत चर्चा करून मराठा आरक्षणप्रश्नी आजच मुख्यमंत्री ठोस निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.
मराठा आरक्षणप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ विधिज्ञांची बैठक
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील ज्येष्ठ विधिज्ञांची बैठक बोलावली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Last Updated : Sep 21, 2020, 8:27 PM IST