मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबूक लाईव्ह द्वारे ( CM FB LIVE ) महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत आहेत. ( CM Interact With People Facebook Live ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके जनतेला काय बोलणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हिंदूत्व हा आमचा श्वास आहे, आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. झाडाचेच लाकुड वापरून स्वतःचे झाड तोडायला निघायला नकोय, मी मुख्यमंत्री नको, तर शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे. मुख्यमंत्री पदी राहायची माझी अजिबात राहायची इच्छा नाही. असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण संपवले. ( Chief Minister Uddhav Thackeray LIVE )
1) तर मी दोन्ही पदाचा राजीनामा द्यायला तयार -शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी शिवसेनेला दिलेल्या थेट आव्हानानंतर पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आज फेसबुकच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देतील अशी चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. त्यानंतर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळीही मुख्यमंत्री राजीनामा देतील अशी चर्चा होती मात्र मुख्यमंत्र्यांनी मी राजीनामा द्यायला तयार आहे, बंडखोरांनी समोर यावे असे भावनिक आवाहन केले.
2) मला मुख्यमंत्री पदाचा मोह नाही - तुम्हाला माझ्या विषयी जर अडचण असेल तर मला हेच सांगायला हवे होते. मी माझा राजीनामा स्वतःहून दिला असता इतकेच काय जर पक्षप्रमुख म्हणूनही जर माझी अडचण वाटत असेल तर मी दोन्ही पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे मात्र तुम्ही समोर येऊन हे मला सांगायला पाहिजे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही समोर येऊन सांगा मी पण सोडायला तयार आहे मला मुख्यमंत्री पदाचा मोह नाही मी कुठल्याही क्षणी वर्षावरून मातोश्रीवर जायला तयार आहे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना केले आहे.
3) शस्त्रक्रियेमुळे भेटू शकलो नाही -मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाही वेळ देत नाहीत अशा तक्रारी आता सांगितल्या जात आहेत हो हे खरं आहे माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर मला लोकांना भेटता आले नाही. त्याआधी कोरोनाचा कालावधी होता आणि त्या कालावधीत मी लोकांमध्ये काम करीत होतो, हे सर्वांना माहीत आहे, आता सध्या ही मी लोकांना भेटत असून लोकांमध्ये काम करीत आहे. मात्र, केवळ अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.