महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेरोजगारांसाठी सरकारचे 'महाजॉब पोर्टल', नोंदणीसाठी डोमिसाइल आवश्यक - उद्योग मंत्री सुभाष देसाई

भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमआयडीसीच्या महाजॉब्स संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं.

महाजॉब नोंदणी
बेरोजगारांसाठी सरकारचे 'महाजॉब पोर्टल', नोंदणीसाठी डोमिसाइल आवश्यक

By

Published : Jul 6, 2020, 5:13 PM IST

मुंबई - भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमआयडीसीच्या महाजॉब्स संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक असल्याचे सांगितले. यामुळे महाजॉबवर नोंदणीसाठी डोमिसाइल धारकांनाच नाव नोंदणी करता येणार आहे.

'बेरोजगारी संपवण्याची ही चांगली संधी'

रोजगारासाठी १७ क्षेत्र निवडली असून यामुळे ९५० हून अधिक व्यवसाय करू शकत असल्याचे देसाई यांनी सांगितले. यासाठी त्यांनी तरुणांना आवाहन केले आहे. नोकरी मागणारे आणि देणारे दोघांना एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आम्ही सर्वेक्षण केल्यानंतर ५० हजाराहून अधिक रोजगार उपलब्ध असल्याचे समोर आले. हे संकेतस्थळ फक्त माहिती देणारं नाही, तर ती मिळेपर्यंत संबंधित यंत्रणा काम करेल. महाराष्ट्रातील रोजगारी संपवण्यासोबत कौशल्य मनुष्यबळ निर्माण करण्यावर आपला भर असेल, असे सुभाष देसाई यांनी दिली आहे.

टाळेबंदीनंतर राज्यात नव्या उद्योगांची नांदी

टाळेबंदीनंतर राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येणार आहेत. नुकतंच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी करोना आजाराच्या संसर्गामुळे कामगारांचे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार पुरवण्यासाठी 'महाजॉब्स' हे संकेतस्थळ तयार करण्यात आलंय. यात उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाने काम केलं आहे.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स संकेतस्थळावर द्यायची आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. करोनाच्या काळात अत्यल्प वेळेत हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details