महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cm Uddhav Thackeray Statement : पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामाला गती द्या, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश - पोहरादेवी तीर्थक्षेत्र

पोहरादेवी संस्थानच्या महंतानी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामाला गती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Uddhav Thackeray
पोहरादेवी संस्थानचे महंत आणि मुख्यमंत्री भेट

By

Published : Jun 17, 2022, 7:29 PM IST

मुंबई - देशातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती देण्याच निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. या तिर्थक्षेत्राचा कालबद्ध आढावा घेण्याच्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.

पोहरादेवी येथील महंतांनी मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामध्ये महंत बाबूसिंग राठोड, मेहताब सिंग नाईक, अॅड अभय राठोड, पोपट चव्हाण व बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे काम रखडता कामा नये -मुख्यमंत्री म्हणाले की पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे काम रखडता कामा नये. वेळच्या वेळी यासाठी निधी दिला जात असला, तरी कालबद्ध रितीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details