मुंबई -महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील चालू व प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांबद्दल ट्विटवरून माहिती दिली.
हेही वाचा -'Omicron Variant'ची दहशत, टाळेबंदी नको असेल तर नियम पाळा - मुख्यमंत्री
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याने विरोधक प्रत्येक मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारला व नेत्यांना लक्ष्य करत आहेत. ठाकरे सरकार दोन वर्षांत जनतेच्या प्रश्नांवर पूर्णपणे अपयशी झाले, अशी आगपाखड भाजप नेते आघाडी सरकारवर करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात पायाभूत सुविधांची काय अवस्था आहे, विशेषकरून रस्त्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये रस्त्यांच्या बाबतीत पायाभूत सुविधा व प्रस्तावित प्रकल्पांविषयी माहिती देण्यात आलेली आहे.