महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Soniya Gandhi Letter : केंद्र सरकारविरोधातील पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्वाक्षरी नाही; महाविकास आघाडीत संभ्रम

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारला यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये देशभरात होणाऱ्या दंगली किंवा दोन गटांमध्ये हाणामारी बाबत उल्लेख आहे. देशभरातल्या 13 विरोधी पक्षांनी या पत्राला समर्थन देत या पत्रावर स्वाक्षरी केल्या आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Apr 19, 2022, 10:27 AM IST

मुंबई - देशभरामध्ये तणावाचं वातावरण दिसत असताना, अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांदरम्यान दंगल किंवा दोन गटांमध्ये हाणामारी सारख्या घटना सातत्याने होत असल्याने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारला यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये देशभरात होणाऱ्या दंगली किंवा दोन गटांमध्ये हाणामारी बाबत उल्लेख आहे. देशभरातल्या 13 विरोधी पक्षांनी या पत्राला समर्थन देत या पत्रावर स्वाक्षरी केल्या आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याने महाविकास आघाडी मध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

पंतप्रधानांचे मौन - देशात शांतता आणि एकता असायला हवी यासाठीच पत्र सोनिया गांधी यांच्याकडून लिहिण्यात आलं आहे. तसेच हिंसाचाराला जबाबदार असलेल्या लोकांना कठोर शासन करण्यात यावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. मात्र देशात होणाऱ्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौन धरून गप्प बसले आहेत. तसेच तणाव निर्माण करणाऱ्या लोकांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला जातोय याबाबत चिंता आहे सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्रातून व्यक्त करण्यात आली.

विरोधक एकवटले - देशात अनेक ठिकाणी सशस्त्र मिरवणुका काढल्या जातात या मिरवणुका आतून दोन गटांमध्ये वाद निर्माण होतो त्यामुळे देशात शांतता भंग होत चालली असल्याचे या पत्रातून म्हटले आहे. या पत्राला तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय (एम), पीसीआय, डीएमके, आरजेडी, जेकेएनसी सोबतच इतर पक्षांनी पाठिंबा दिलाय. मात्र महा विकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रावर अद्याप सही केलेली नाही अशी माहिती मिळत आहे.



हिंदू मते फुटण्याची भीती - शिवसेनेचा अजेंडा शिवसेना ठरवत असते. शिवसेनेकडे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. ही काही लोकांची पोटदुखी, वेदना आहे. आम्ही काय करायचं आणि काय नाही याबाबत आम्हाला कोणाला विचारावं लागत नाही. काल देशातील १३ नेत्यांनी संयुक्त पत्रक काढलं. त्यावर शिवसेनेची सही नाही. आम्ही ठरवलं आम्हाला त्यावर सही करायची नाही. आम्हाला विचारावं लागत नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत केले. मात्र त्या पत्रावर स्वाक्षरी केल्यास हिंदू मतं फुटतील अशी भीती शिवसेनेला वाटत आहेत. त्यामुळे स्वाक्षरी करण्यास मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली

ABOUT THE AUTHOR

...view details