मुंबई -भारतीय जनता पक्षाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांची फसवणूक केल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. युतीच्या काळात हिंदूत्वाच्या नावाने भाजपाने बाळासाहेबांची फसवणूक केल्याचे ( BJP Cheating With Balasaheb Thackeray ) त्यांनी म्हटले आहे. मात्र, मी भाजपा डावपेचांना बळी पडणार नाही, असेही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? -हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. त्याचा डंका वाजवण्याची आम्हाला गरज नाही. विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेना हिंदूत्वाच्या आधारे लढवली आणि जिंकली. त्यावेळी भाजपाने विरोधात उमेदवार उभा केला होता. त्यानंतर भाजपाचे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हिंदूत्वाच्या आधारे युती करण्यासाठी आले होते, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.