मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपाने राज्य सरकारला आव्हान दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. सरकार पडणार असा सतत इशारा भाजपाकडून दिला जातो. त्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी सरकार पाडून दाखवावं. माझे 170 मोहरे आहेत. ते मला सोडून तुमची गुलामगिरी करणार नाहीत. हिंमत असेल तर ते फोडून दाखवाच, असे प्रतिआव्हान दिले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनमुळे आता वादळी ठरण्याची शक्यता आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनामा, एसटीचा संप, ओबीसी - मराठा आरक्षण आदी विविध मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची व्यूहरचना आखली. राज्य सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला. यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामटेक बंगल्यावर उपस्थित होते. भाजप म्हणजे एक सापाची जमात असल्याचा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री ठाकरे यांनी चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित होते.
दाऊदच्या मुसक्या का आवळत नाहीत?