मुंबई -कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लस घेत आहेत. मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ डाक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस घेतली. भारत बायोटेकने तयार केलेली ही स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन लस आहे. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही कोरोनाची लस घेतली आहे.
या नेत्यांनी घेतली कोरोना लस -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी 1 मार्चला सपत्निक मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली होती. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्येंकैया नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आदिंसह देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली आहे.