मराठा आरक्षण मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक - undefined
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे मराठा आरक्षण मुद्द्यावर बैठक बोलावली आहे. या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे सर्व सदस्य तसेच शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटेंसह मराठा समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडे बारा वाजता ही बैठक होणार असून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका तसेच राज्य सरकारची कायदेशीर बाजू याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे मराठा आरक्षण मुद्द्यावर बैठक बोलावली आहे. या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे सर्व सदस्य तसेच शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटेंसह मराठा समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडे बारा वाजता ही बैठक होणार असून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका तसेच राज्य सरकारची कायदेशीर बाजू याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
गेल्या महिन्यात पार पडलेल्या संसद अधिवेशनात केंद्र सरकारने 127वी घटना दुरुस्ती करून विशेष प्रवर्ग तयार करण्याचे अधिकार केंद्राने राज्याला दिले आहेत. मात्र राज्यांना केवळ विशेष प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार देऊन चालणार नाही. आरक्षणाची मर्यादा शिथिल केल्याशिवाय राज्य सरकारला आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार का नाही? याबाबत पेच निर्माण झाला आहे. या पेचप्रसंगातच राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.