मुंबई - फडणवीस म्हणाले ( CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis ) होते, आम्ही मुंबई स्वतंत्र करणार, तुमच्या 1707 पीढ्या जरी आल्या तरी ते होऊ देणार नाही. मुंबई आंदन म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे, तिला हिरवणाऱ्यांचे तुकडे करणार, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray on BJP ) यांनी भाजपला दिला आहे.
हेही वाचा -Ketaki Chitale Controversy : कोण आहे केतकी चितळे?, का आली अडचणीत
आज मुंबईतील बीकेसी ( Uddhav Thackeray news Mumbai bkc ) येथील शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून ( CM Uddhav Thackeray on Hindutva in Mumbai ) भाजपला धारेवर धरले.
खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष देशाची दिशी भरकटवत आहे. आमचा हिंदुत्व अतिरेक्यांना बडवणारा हिंदुत्व आहे. गाढव आमच्या सोबत होते, त्यांनी लात मारायच्या आत आम्ही त्यांना लात मारली, असे देखील उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray news Mumbai ) म्हणाले. काँग्रेसमध्ये गेलो कारण तुम्ही ढकलले. सत्ता गेली तरी फरक पडत नाही. आमचे हिंदुत्व तकलादू नाही. हिंदुत्व म्हणजे धोतर वाटले का. बोगस हिंदुत्ववादीने मुफ्तीसोबत सत्ता स्थापन केली, डोक्यात भगवी टोपी घालून हिंदुत्व सिद्ध होत नाही, तो मेंदूत असावा लागतो. आम्हाला घर पेटवणारे हिंदुत्व नाही, चुल पेटवणारे हिंदुत्व हवे आहे. राम, हनुमान यांचा अपमान करू नका, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.