मुंबई - विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते तसेच इतर सर्व प्रमुख राजकीय पक्ष नेते यांच्यासोबत आज (गुरुवार) दुपारी २ वाजता मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणार आहे. यात राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; फडणवीसांसह राज ठाकरेंनाही निमंत्रण - राज ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 2 वाजता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण आहे.
हेही वाचा...चिंताजनक..! राज्यात आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या १६ हजार ७५८
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव इतर राज्यांपेक्षा अधिक गतीने होताना दिसत आहे. बुधवारी एकाच दिवसात राज्यात तब्बल हजार २३३ नवीन रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजारांच्या पार गेला आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे दुपारी 2 वाजता विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते, इतर सर्व प्रमुख राजकीय पक्ष नेते यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे यासंदर्भात चर्चा करणार आहेत.