महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Thackeray Surgery : मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल; शुक्रवारी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता - उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री ठाकरे यांना आज मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Nov 10, 2021, 6:58 PM IST

Updated : Nov 10, 2021, 10:03 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या मणक्यात आणि मानेमध्ये त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना आज मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाकाळात आलेल्या कामाच्या भारामुळे आपल्या तब्येतीकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून, राज्यातील जनतेला एक भावनिक संदेश त्यांनी दिला आहे.

हेही वाचा -ParamBir Singh : परमबीर सिंग यांच्याविरोधात तिसरे अजामीनपात्र वॉरंट जारी

राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांचा संदेश

माझ्या बंधू, भगिनींनो आणि मातांनो,

जय महाराष्ट्र!

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.

आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.

यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे

हेही वाचा -ST Strike : राज्यभरात एसटी कर्मचारी आक्रमक; भाजपचीही आंदोलनात उडी; मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन

Last Updated : Nov 10, 2021, 10:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details