मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रथमच आपली भूमिका मांडत शिवसैनिकांना आवाहन केले आहे. तुम्हा घरी जा, मातोश्रीवर यायची कोणाची हिंमत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना म्हटले ( Cm Uddhav Thackeray Appeal To Shivsainik ) आहे.
राणा दाम्पत्यांच्या आव्हानानंतर मातोश्रीसमोर शेकडो शिवसैनिक जमा झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वत: मातोश्रीवर दाखल झाले ( CM Uddhav Thackeray Reached At Matoshri ). यावेळी त्यांनी शिवसैनिकांचे आभार मानले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे मातोश्रीवरुन वर्षा शासकीय निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. 'सकाळ पासून येथे आहात. तुम्ही घरी जा मातोश्रीवर यायची कोणाची हिंमत नाही,' अशी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.
रवी राणा मुंबईत दाखल -रवी राणांनी हनुमान जयंतीदिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. त्यांनी पठण नाही केल तर आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार येथील आपल्या निवासस्थानी आहेत.