महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Uddhav Thackeray On kharif Season : शेतीला आधुनिकतेची जोड द्या, मुख्यमंत्र्याचे शेतकऱ्यांना आवाहन

दिवसेंदिवस नवे तंत्रज्ञान विकसीत होत आहे. शेतकऱ्यांनी या धर्तीवर शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) यांनी आज केले. खरीप हंगामाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली.

CM Uddhav Thackeray On kharif Season
CM Uddhav Thackeray On kharif Season

By

Published : May 19, 2022, 6:25 PM IST

मुंबई -दिवसेंदिवस नवे तंत्रज्ञान विकसीत होत आहे. शेतकऱ्यांनी या धर्तीवर शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) यांनी आज केले. खरीप हंगामाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. कृषीमंत्री दादा भूसे, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, शासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

यंत्रणेने कुटुंबासारखे काम करावे -राज्यात मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. शेतीच्या कामांची लगबग सुरु आहे. पावसाळ्यात कीड, रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होते. यंत्रणांनी अशावेळी शेतकऱ्यांना मदतीसाठी सतर्क राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. तसेच विकेल ते पिकेल अभियान यशस्वी करण्यासाठी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावे. शेतकरी आपल्या कुटूंबातील घटक असून यंत्रणेने आपुलकीने कुटुंबासारखे काम करावे. आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणारे बियाणे शेतकरी बांधवाना मोफत देणारे, शेतकऱ्यांचा आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

खरीप हंगाम यशस्वी होईल -शेतमालाला हमीभाव आहेच. पण हमखास भाव मिळाला पाहिजे. पीक विमा योजना समाधानकारक नाही. राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश मिळते आहे, असे दिसते. केंद्र सरकार त्यावर विचार करत आहे, ही चांगली बाब आहे. यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. कृषी विभागाने उत्तम नियोजन केले आहे. पूर्व तयारी समाधानकारक आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा -Hedgewar Smriti Bhavan Reiki Case : दहशतवादी रईस अहमद शेखचा कश्मीर ते नागपूर रेकी प्रवास, कोणी केली मदत?

ABOUT THE AUTHOR

...view details