दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा; मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेण्याचे आदेश - दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा
राज्यात कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव अजूनही गंभीर असल्याने यावर सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आज राज्यातील शाळा वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे 15 ऑक्टोबरपासून सुरू न करता दिवाळीनंतर सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे, याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत.
मुंबई -केंद्र सरकारने १५ ऑक्टोबर पासून देशातील शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्या तरी आपल्याकडे कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता या शाळा दिवाळीनंतर सुरू केल्या जाव्यात अशी चर्चा आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली.
यावेळी अनेक मंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीचा विचार केला जावा, असे मत मांडले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा आणि त्यांच्यात सुरू झालेल्या ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेण्याचे निर्देश दिले.
केंद्रीय गृह विभागाने सर्व शाळा या १५ ऑक्टोबर पासून सुरू कराव्यात, असे निर्देश दिले आहेत. त्यासाठी शाळा सुरू करताना त्याच्या सर्व मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. मात्र, राज्यात कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव अजूनही गंभीर असल्याने यावर सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आज राज्यातील शाळा वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे 15 ऑक्टोबरपासून सुरू न करता दिवाळीनंतर सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे, याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत.